Take a fresh look at your lifestyle.

तुम्हाला मधुमेह झालाय हे कसं ओळखाल?, या ८ सामान्य लक्षणांपासून वेळीच सावध व्हा !

महाअपडेट टीम 13 फेब्रुवारी 2021 :-  भारतात 31 कोटींहून अधिक मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार. दरवर्षी यात मोठी वाढ होत आहे. बदलेली जीवनशैली या आजाराव कारणीभूत ठरत आहे. ताणतणाव, आहाराकडे झालेले दुर्लक्ष आणि व्यायामाचा अभाव ही मधुमेहची प्रमुख कारणे आहेत. काही लक्षणांकडे लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की मधुमेह आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मधुमेह होण्यापूर्वी शरीर आपल्याला असे काही संकेत देतो, ते वेळीच ओळखून आपण मधुमेहाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ शकतो. 

Advertisement

जास्त प्रमाणात किंवा वारंवार तहान लागणे मधुमेहाचे लक्षण असते. मधुमेह झाल्यावर व्यक्तीचे मूत्रपिंड जास्तीत जास्त ग्लुकोज तयार करते. अशाने व्यक्तीच्या शरीरात पाणी कमी होण्यासोबत व्यक्तीला तहान लागते. म्हणून जर जास्त प्रमाणात आणि वारंवार तहान लागत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Advertisement

मधुमेहात एक लक्षण असे आढळते की, लहानातलया लहान जखमेला सुद्धा बरं होण्यास महिनाभर किंवा त्याहूनही अधिक वेळ लागू शकतो. कारण की, शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण वाढल्याने त्यातील रक्तातील घाव बरे करणारे घटक कमी होते .त्यामुळे जखम चघळून त्याचे रूपांतर गँग्रीन मध्ये होते.

Advertisement

तीन ते चार महिन्यांच्या काळात अडीच ते तीन किलो वजन कमी होणे मधुमेहाच्या शक्यतेकडे इशारा करते. असे होण्यामागचे कारण म्हणजे आपले शरीर पुरेशा प्रमाणात ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवू शकत नाही. परिणामी, वेगाने वजन कमी होऊ लागते.

Advertisement

वारंवार भूक लागण्याची समस्यादेखील मधुमेहाचे एक धोकादायक लक्षण असू शकते. शरीरात रक्तातील शुगरचे प्रमाण घटू लागते, तेव्हा व्यक्तीच्या भुकेत वाढ होते. शरीरातील पेशींना पुरेशा प्रमाणात शुगर न मिळाल्याने ऊर्जा मिळत नाही. ही गरज पूर्ण करण्यासाठी शरीराला अतिरिक्त आहाराची गरज लागते आणि भूक वाढते.

Advertisement

त्वचेला होणारी खाज, दाग आणि दाह यासारख्या समस्यादेखील मधुमेहाकडे इशारा करतात. विशेषत: गळ्यावर सुरकुत्या पडल्या किंवा लाल डाग पडल्यास समजावे की, मधुमेहाचा धोका आहे. इन्सुलिनचे वाढते प्रमाण याचे कारण असते.

Advertisement

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अशक्तपणा जाणतो. अशा परिस्थितीत दिवसभर आळशीपणाचा अनुभव येतो. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावरही शरीराची ऊर्जा कमी होते. त्यामुळे थकवा जाणवतो.

Advertisement

अचानक किंवा कधी कधी अंधुक दिसण्याची समस्यादेखील मधुमेहाचा इशारा देते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांतील बाहुल्यांचा आकार बिघडतो. यामुळे पाहण्यासाठी त्रास होतो. साखर नियंत्रित झाल्यास सामान्यपणे दिसू लागते.

Advertisement

 

Advertisement
Advertisement