महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल -डिझेलच्या दरात वाढ केली. दिल्लीत आज डिझेलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली आहे, तर इतर शहरांमध्येही किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. या आठवड्यातील मंगळवारपासून किंमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई – ९४.९३ ८५.७०
परभणी – ९७.०६ ८५.४५
नांदेड – ९६.८७ ८६.२८
पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३६ पैशांनी महागले.
आठवडाभरात सलग पाचव्या दिवशी इंधन महागले आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर चेन्नईत ९१ रुपयेआणि बंगळुरुत ९२ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.
या कारणामुळं भारतात आहे इंधन महाग –
दुहेरी कर पद्धतीमुळे भारत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महाग आहे. आपण बघितलं तर पेट्रोलवर जवळपास १८० टक्के आणि डिझेल वर १४० टक्के कराचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतो. याचा अर्थ सध्या पेट्रोलच्या किमतीत जवळपास ५० रुपये हे करापोटी द्यावे लागत आहेत. डिझेलमध्ये हे प्रमाण जवळपास ४० रुपये आहे.
१ एप्रिल २०२० रोजी पेट्रोलवर ३७.८० रुपये आणि डिझेलवर २८ रुपये कर होता.
करोना काळात केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ केली होती. तर राज्य सरकारांनी देखील व्हॅटमध्ये वाढ केली होती. आजच्या घडीला स्थानिक करांमुळे राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सर्वात महाग आहे.
१ फेब्रुवारी २०२१ रोजी पेट्रोलवरील कर ५२.९० रुपये आणि डिझेल ४३.१ रुपयांपर्यंत वाढला.
पेट्रोल आणि डिझेलमधील करवाढीमुळे सरकारला चालू वर्षात किमान ३.४६ लाख कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाचे पेट्रोल डिझेल तयार होताना त्यात तेल वितरक कंपन्याचे मार्जिन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्थनिक कर , उत्पादन शुल्क, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स (VAT), अधिभार (cess) आकारला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेल दरातील मोठा वाटा हा कराने व्यापला आहे.
या करवाढीमुळे सरकारला चालू वर्षात किमान ३.४६ लाख कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाचे पेट्रोल डिझेल तयार होताना त्यात तेल वितरक कंपन्याचे मार्जिन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्थनिक कर , उत्पादन शुल्क, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स (VAT), अधिभार (cess) आकारला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेल दरातील मोठा वाटा हा कराने व्यापला आहे.