Take a fresh look at your lifestyle.

एक लसणाची पाकळी तुमच्यासाठी काय-काय करू शकते ? एकदा वाचून पहा तुम्हीही अवाक् व्हाल

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :-  लसूण आजकालच्‍या आहारातील एक अविभाज्‍य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्‍या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात.

Advertisement

परंतु, त्‍याच्‍या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्‍वरुपात वापरण्‍यात येत आहे. जवळपास 5 हजार वर्षांपूर्वी लसूण औषधी म्‍हणून भारतात वापरण्‍यात येत होता.

Advertisement

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत लसणाचे हजारो वर्ष जुने औषधी उपयोग जे फारच कमी लोकांना आहेत ठाऊक आहे.

Advertisement

दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्‍यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्‍नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात.

Advertisement

लसणात ऍन्‍टीबॅक्‍टेरियल गूण आहेत. म्‍हणूनच तारुण्‍यपिटीकांची समस्‍या असल्‍यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्‍यपिटीकेवर लसणाची पाकळी लावून हलक्‍याने रगडल्‍यास लवकरच आराम मिळतो.

Advertisement

लसणाच्‍या नियमित सेवनाने त्‍वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्‍या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा ऍथलिट फुट यासारख्‍या आजारांवर लसूण गुणकारी आहे.

Advertisement

लसूण शरिरात इन्‍सूलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्‍या रुग्‍णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तसेच लसणाचे सेवन कॉलेस्‍ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्‍यामुळे रक्ताच्‍या गाठी निर्माण होत नाही.

Advertisement

लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्‍सच्‍या प्रभावापासून वा‍चवितो. तसेच सल्‍फरयु्क्त गूण रक्तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. ऍन्‍टी क्‍लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्‍यांमध्‍ये रक्ताच्‍या गाठी तयार होत नाहीत.

Advertisement

रोज लसणाचे सेवन केल्‍यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्‍यावर लसूण टाकलेला चहा गूणकारी आहे.

Advertisement

थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्‍यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.

Advertisement

लसणात ऍन्‍टी इन्‍फ्लामेटरी गूण आहेत. ज्‍यामुळे ऍलर्जीला दूर पळविता येते. लसणातील ऍन्‍टी आर्थीटिक गुणांमुळे डायलीसल्‍फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्‍यायल्‍यानेही अनेक फायदे आहेत.

Advertisement

लसणाचे नियमित सेवन केल्‍यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

Advertisement

लसूण ठेचून त्‍याचा रस एखाद्या काचे ग्‍लासच्‍या हेअरलाईन क्रॅकवर लावल्‍यास ती भरुन जाते आणि ग्‍लास वाचतो.

Advertisement

सिरोसियसच्‍या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्‍यास त्‍वचेला खूप आराम मिळतो आणि समस्‍या दूर होते.

Advertisement

लसणात डायली-सल्‍फाईड असते. त्‍यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्‍हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्‍यात मदत होते.

Advertisement

नियमित लसूण सेवन केल्‍याने रक्तदाब नियंत्रित राहतो. ऍसिडीटी आणि गॅसेसच्‍या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्‍या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.

Advertisement

दुधात लसूण उकळवून पाजल्‍यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्‍या पाकळ्या भाजून खाल्‍यास लहान मुलांना श्‍वास घेताना होणारा त्रास दूर होतो. ज्‍या मुलांना सर्दीचा त्रास जास्‍त होतो, त्‍यांना लसणाच्‍या पाकळ्यांची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.

Advertisement

लसणाच्‍या सेवनाने कामोत्तेजना कायम राहते.

Advertisement

वजन घटविण्‍यात लसूण गूणकारी आहे. शरिरातील वसा कोशिकांना विनियमित करण्‍याची क्षमत लसणात आहे. त्‍यामुळे वजन कमी होते.

Advertisement

गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्‍च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्‍थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.

Advertisement

लसणाच्‍या सेवनामुळे व्‍हायरल, फंगल, यीस्‍ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्‍या लसणाच्‍या सेवनामुळे अन्‍नातून विषबाधा होण्‍याचा धोका कमी होतो.

Advertisement

शरिरात रक्ताची कमतरता असल्‍यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्‍यास लोह आवश्‍यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्‍यामुळे स्‍कर्वी रोगापासूनही बचाव होतो.

Advertisement

लसणाच्‍या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्‍थमासारख्‍या श्‍वसनविकारात लसूण गूणकारी आहे.

Advertisement

लसणाच्‍या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात ऍलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्‍फरही असते. लसणाची पेस्‍ट डोक्‍याला लावल्‍यास केस गळणे कमी होते

Advertisement

लसूण नियमित सेवन केल्‍यास दातांच्‍या दुखण्‍यामध्‍ये आराम मिळतो. दात दुखत असल्‍यास लसणाची पेस्‍ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात ऍन्‍टी बॅक्‍टेरियल तत्त्व असतता. त्‍याचा फायदा होतो.

Advertisement

लसूण एक नैसर्गिक पेस्‍टीसाईड म्‍हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करुन नैसर्गिक किटकनाशक तयार केले जाऊ शकते.

Advertisement

लसणाच्‍या 5 पाकळ्या बारीक करुन त्‍यात थोडे पाणी टाकावे. त्‍यात 10 ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.

Advertisement

लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गूणकारी आहे. 5 वर्षांपर्यंतच्‍या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो.

Advertisement
Advertisement