Take a fresh look at your lifestyle.

चिमूटभर धने आरोग्यात करेल ‘हे’ ५ चमत्कारिक बदल, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- अन्नाचा स्वाद वाढविणारे धने भोजनाच्या प्रति रूची तर वाढवतातच शिवाय पोषणही देतात. धन्यांचा वापर केवळ मसाला नाही तर औषध म्हणूनही केला जातो. चवीला छान असणारे धने हा अतिशय थंड पदार्थ असतो कोथिंबीर आणि धने यामध्ये वेगवेगळे गुण आढळतात, पोटॅशियम, लोह, जीवनसत्त्व, फॉलिक एसिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रथिनं, फायबर्स, कर्बोदकं, खनिजं, कैरोटिन यांचा समृद्ध स्रोत म्हणजे धने.

Advertisement

किराणा दुकानात सर्रास धने मिळतात. दक्षिणभारतात सांबार हे प्रत्येक घरी करतात. धन्यामुळे आपले अन्न पदार्थ चवदार, रूचकर, स्वादिष्ट होतात व त्यापासून आरोग्यदायी शरीर होण्यासाठी खूप उपयोग होतो

Advertisement

काही जणांना धने आणि कोथिंबीरीचं अधिक प्रमाणात सेवन करण्याची सवय असते. हे सुद्धा आरोग्यासाठी अपायकारक ठरतं. म्हणून धने आणि कोथिंबीर यांचं प्रमाणात सेवन करा. अधिक प्रमाणात सेवन करण्याने पोट दुखणे, सूज, रॅशेस यांसारख्या समस्या निर्माण होतात. तसंच त्वचेवर सनबर्न होण्याची शक्यता वाढते.

Advertisement

त्वचेची सूज –
शरीराच्या अनेक अवयवांना सूज येते. ती नाहीशी करण्यासाठी अनेक प्रकारची औषधं घेतली जातात. जी अनेकदा नुकसानकारक ठरतात. अशावेळेस धन्यांच्या वापर करून सूज नाहीशी करता येते.

Advertisement

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण –
धन्यांमध्ये अशी एसिड असतात, जी रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीला कमी करण्यास परिणामकारक ठरतात. धन्यांच्या सेवनाने आपण वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवू शकतो.

Advertisement

पचनाशी संबंधित समस्या –
कोथिंबीरीत अधिक प्रमाणात फायबर्स असतात. म्हणून याचं सेवन करण्याने पचन यंत्रणा ठीक रहाते. पोटाशी संबंधित आजार होत नाहीत,

Advertisement

एनिमियापासून बचाव –
धन्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. याच्या नियमित सेवनाने एनिमियापासून दूर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्ताची कमतरता, श्वसनाशी संबंधित तक्रारींपासून दूर रहाता येतं.

Advertisement

डोळ्यांची काळजी –
धन्यांमध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, जीवनसत्त्व आणि फॉस्फरस असतं, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. हा घटक डोळ्यांच्या समस्यांपासून मुक्ती देतो, तसंच दृष्टी सुधारण्यासही मदत होते. रक्तदाबावर नियंत्रण धने आणि कोथिंबीर दोन्हीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित करता येतो. कारण यामध्ये कॅल्शियम आणि लोह यांच्याशिवाय इतरही अनेक घटक असतात जे नर्व्हस सिस्टिम आणि तणावाला नियंत्रित करण्याचं काम करतात.

Advertisement
Advertisement