Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार म्हणाले, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोकं शेतकरी नव्हते तर… ,

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला, याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली असता, हे लोक शेतकरी नव्हते तर सत्ताधारी गटाचे काही लोक होते, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.

Advertisement

शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर असून आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली.

Advertisement

त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

Advertisement

पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एवढीच त्यांची मागणी आहे. केंद्र सरकार केवळ आश्वासन देतेय मात्र प्रत्यक्ष काहीच करत नाही, असा आरोपही पवार यांनी केला आहे.

Advertisement
Advertisement