Take a fresh look at your lifestyle.

हिवाळ्यात रोज तुळशीची ८ ते १० पाने दुधात उकळून पिल्यास काय होईल ?

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :-  सर्वप्रथम दीड ग्लास दूध उकळून घ्या. ज्यावेळी दूध उकळू लागेल. त्यावेळी यात ८ ते १० तुळशीची पाने टाका आणि उकळू द्या. दूध एक ग्लास एवढे राहील त्यानंतर गॅस बंद करा. नंतर हे दूध कोमट करून प्या.

Advertisement

प्रतिकारशक्ती वाढते –
तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट असते जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. या दुधात अॅँटिबॅक्टेरियल आणि अॅँटिव्हायरल गुण असतात, जे संसर्गजन्य ताप,सर्दी आणि खोकला बरा करण्यास साहाय्य करते.

Advertisement

वजन कमी करते –
जर तुम्ही वजन वाढल्यामुळे त्रस्त आहात तर तुळशीयुक्त दूध पिणे सुरू करा. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. श्वासासंबंधी समस्येला दूर करण्यासाठी दूध फायदेशीर ठरते.

Advertisement

तणाव कमी होतो –
तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुण असतात. जर तुम्ही तणाव, उदासीनतासारख्या समस्यांनी त्रस्त राहत असाल तर दररोज हे दूध प्या. मेंदू शांत ठेवण्यासाठी या दुधाला जास्त गार करून पिणे फायदेशीर राहील. मानसिक तणाव आणि चिंता दूर करण्यासही हे दूध साहाय्य करते.

Advertisement
Advertisement