मोबाइलवर लपूनछपून पॉर्न सर्च करत असाल तर सावधान, अशा प्रकारे सापडू शकता पोलिसांच्या तावडीत
महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- कोविड-19 दरम्यान पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. धक्कादायक बाब अशी की, कोविड-19 चं लोकडाऊन झाल्यांनतर देशात ‘चाइल्ड पॉर्न’, सेक्सी चाईल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ यांसारखे शब्द इंटरनेटवर टाकून त्यातून वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने मुलांच्या जीवाला व सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाल्याचं समोर आलं आहे.
परंतु आता पॉर्न पाहणाऱ्यांना हे महागात पडू शकतं. कारण मोबाइलवर कोण कोण अश्लील व्हिडिओ पाहतोय, यावर १०९० ची एक टीम वॉच राहणार आहे. अश्लिल फोटो, आणि व्हिडिओ सर्च करणाऱ्या भामट्यांना अलर्ट केला जाणार आहे.यासोबत महिलांच्या सुरक्षेसाठी अलर्ट असलेले १०९० वेळोवेळी जागृत करण्याचे मेसेज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाठवणार आहेत.
१०९० च्या एका आयोजित कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी इंटरनेटवरील वाढत्या सर्च मोहीमेसंबंधी बोलताना ही माहिती दिली आहे. १०९० ने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश मध्ये डिजिटल चक्रव्यूह (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आउटरिच रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
एडीजी नीरा रावत यांनी सांगितले की, इंटरनेटच्या एनालिटिक्सला स्टडी करण्यासाठी oomuph नावाची एक कंपनी आहे. डेटाच्या माध्यमातून इंटरनेट वर काय सर्च केले जात आहे. यावर वॉच ठेवला जाणार आहे. जर एखादी व्यक्ती इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहत असेल तर त्याचे संकेत ए नालिटिक्स टीमला मिळतील. टीम त्याच्यासंबंधी १०९० टीमला कळवणार आहे. त्या व्यक्तीला अलर्ट करण्यासाठी एक मेजेस पाठवला जाईल. असे करून गुन्ह्याच्या सुरुवातीला रोखता येऊ शकते.