Take a fresh look at your lifestyle.

भाविकांच्या बोलेरोला भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

महाअपडेट टीम 12 फेब्रुवारी 2021 :-  कोल्हापुरातील कुटुंब पंढरपूरला जात असताना आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास कासेगाव परिसरात भाविकांच्या बोलेरो गाडीला ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि लहान मुलं अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील मृत आणि जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisement

जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Advertisement

पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी प्रवास करत असताना भाविकांवर काळानं घाला घातलाय. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच कासेगाव जवळच्या रस्त्यावर बोलेरो गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला पाठी मागून जाऊन जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झालाय.

Advertisement
Advertisement