Take a fresh look at your lifestyle.

गृहमंत्र्यानंतर आता गृहराज्यमंत्रीही कोरोनाग्रस्त, स्वतःच ट्वीट करुन दिली माहिती

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021:- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्यांनतर गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी काही वेळापूर्वी त्यांनी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

Advertisement

सतेज पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.

Advertisement

Advertisement

काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः देशमुख यांनी शुक्रवारी ट्वीट करून दिली. दरम्यान, कोरोनावर मात करून मी पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असा विश्‍वासही देशमुख यांनी ट्‌विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement