महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021:- एका नराधम सासऱ्यानं थेट आपल्या सुनेवरच बलात्कार केल्याची भयानक घटना मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील रहटगाव पोलीस ठाणे क्षेत्रात घडल्याचे समोर आली आहे. याप्रकरणी चिंचला पोलीस ठाण्यात सासरा, पती यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून बलात्कार करणं, धमकावणं आणि इतर गुन्ह्यांबाबतची कलमं लावण्यात आलेली आहेत.
धक्कादायक बाब अशी की, या प्रकरणात ही पीडिता गर्भवती असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून पीडितेच्या नवऱ्यासह सासऱ्याने आपल्या कुटुंबासोबत मिळून कट केला. आणि या सगळ्या कुटुंबीयाने धमकावलं व कुणालाही काही न सांगण्याची ताकीद दिली.
परंतु घाबरलेल्या अवस्थेत तिने कसाबसा माहेरच्या लोकांशी संपर्क साधून आपबिती सांगितली. यानंतर संतापलेल्या माहेरच्या लोकांनी चिचोली ठाण्यात सासरा, पती यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरा चिचोली ठाणे क्षेत्रात कचनार भागातील जंगलात आपल्या कुटुंबासह राहतो. त्याचा मुलगा गुरुचरणच्या पत्नीवर त्याची वाईटनजर होती. या वाईट नजरेतून सासऱ्यानं गुरुचरणच्या पत्नीवर 1 ऑगस्ट 2019 पासून 3 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान अत्याचार केले.
पीडितेनं ही गोष्ट अत्यंत व्यथित मनानं आपला पती आणि सासरच्यांना सांगितली तेव्हा त्यांनी मदत करण्याऐवजी तिलाच धमकावलं. तोंड न उघडण्याबाबत सक्त ताकीद दिली. परंतु पीडितेनं धाडस दाखवून आपल्या माहेरच्या लोकांना माहिती दिल्याने हे प्रकरण समोर आहे आहे.