Take a fresh look at your lifestyle.

…आधी पत्नी म्हणून स्वीकारले, नंतर प्रेमीयुगलाची ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021:- प्रेयसीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा या गावात घडली आहे. लिकेश भेंडारे (वय २३, रा. पेंढरी जि. गडचिरोली) आणि किरण नंदनवार (वय १९, रा. भंडारा) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.त्यांच्या विवाहाला घरच्यांची संमती नसल्याच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, किरण ही धानोरा येथील नातेवाइकांकडे राहात होती. तर लिकेश हा धानोरा येथे रोजंदारीवर काम करत होता, किरण ही स्थानिक कॉलेजमध्ये शिकत असताना तिची ओळख लिकेश या तरुणाशी झाली होती. ओळखीतून त्या दोघांचे प्रेम जुळले, परंतु या दोघांच्या प्रेमाची कल्पना घरच्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.

Advertisement

दरम्यान, किरण सोमवारी सकाळी ११ वाजता कॉलेजला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. ती संध्याकाळपर्यंत आलीच नसल्याने शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, लिकेश आणि तिच्या प्रेमाबद्दल घरच्यांना समजले.

Advertisement

त्यावरून लिकेशच्या खोलीचा शोध घेण्यात आला. त्याच्या खोलीत दोघांचेही मृतदेह छताला शेला आणि ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. किरणने आत्महत्येपूर्वी लिकेशने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला पत्नी म्हणून स्विकारल्याचे चौकशीत आढळले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement