Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021:- सिनेसृष्टीतून कपूर घराण्यातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कपूर घराण्यातील ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते होते.वयाच्या ५८ वर्षांचे असताना चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisement

गेल्यावर्षीच अभिनेते ऋषी कपूर यांचं कॅन्सरमुळे निधन झाले होते. परंतु या नवीन वर्षातही मंगळवारी त्यांच्या कुटुंबाला आणखी एक धक्का बसला. सकाळी नाश्ता केल्यानंतर त्यांना त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं.

Advertisement

परंतु कुणाला सांगेपर्यंत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचारांपूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.

Advertisement

ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शन राजीव कपूर यांनी केलं होतं. राजीव कपूर हे विशेषतः ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘एक जान हैं हम’ (१९८३) मधील अभिनयामुळे प्रसिद्धीत आले होते.

Advertisement
Advertisement