Take a fresh look at your lifestyle.

हॉर्न वाजवल्याच्या कारणातून शिवनेरी बस चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली !

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021:- शिवनेरी बसच्या चालकाने हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने तिघांनी चालकाला शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली आहे. यात चालक गंभीर जखमी झाला असून दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

बादल महेंद्र ढावरे (वय २६, रा. मंगळवार पेठ) व मेहबूब दस्तगीर सिंदगी (वय २६,रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बसचालक अमोल गायकवाड (वय ३४, रा. देहू) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

अमोल गायकवाड राज्य परिवहन विभागात चालक आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास ते शिवनेरी बस घेउन चालले होते. मालधक्का चौकात अमोलने बसचा हॉर्न वाजविला.

Advertisement

त्याचा राग आल्यामुळे तिघांनी शिवनेरी बस अडवून चालकाला हॉर्न का वाचविला अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement