Take a fresh look at your lifestyle.

विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला गळती, या बड्या नेत्याचा १५० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021 :-  सध्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु असताना हा मोर्चा आता बीडमध्ये वळला आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Advertisement

बीड शहर मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकानी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.

Advertisement

परंतु आता, संदीप क्षीरसागर यांनी थेट भाजपचे आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांच्या हातावर घड्याळ बांधले. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड असल्याने त्यांना जाहीर प्रवेश देऊन रिकामी झालेली पोकळी राष्ट्रवादीने भरून काढली आहे.

Advertisement

बीड नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोरच राष्ट्रवादीला धक्का बसल्याने संदीप क्षीरसागरांनी आता शिवसंग्रामच्या नेते- कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आ. विनायक मेटे यांना मोठा झटका दिला आहे. गेल्या वर्षभरात शिवसंग्रामला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. निष्ठावंताची पक्षात कदर नसल्याची नाराजी उघड झाली आहे. तसेच आ. विनायक मेटेंचे बंधू रामहरी मेटे यांच्याभोवतीच राजकारण फिरत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज नाराज असल्याचं बोललं जात आहे.

Advertisement
Advertisement