Take a fresh look at your lifestyle.

19 वर्षीय तरुणीवर कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून सामूहिक बलात्कार

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021:- 19 वर्षीय तरुणीला कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून तिच्यावर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पनवेलमधील खारघरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला खारघर पोलिसांनी अटक केली असून फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Advertisement

यातील पिडित तरुणी व अत्याचार करणारे दोघे आरोपी हे तरुणीच्या ओळखीचे असून हे र्व खारघरमधील एकाच भागात राहणारे आहेत. पीडित तरुणी राहात असलेल्या भागात हळदीचा कार्यक्रम असल्याने पीडित तरुणी आई-वडिलांसह हळदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती.

Advertisement

यावेळी पिडित तरुणीला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी गेली असताना आरोपींनी तिला जवळच असलेल्या बसमध्ये नेऊन कोल्ड्रिंक्समध्ये दारु मिसळून तिला पिण्यासाठी दिले.

Advertisement

त्यानंतर पीडित तरुणी ही बेधुंद अवस्थेत असताना या दोन नराधमांनी बसमध्येच तीच्यावर आळीपाळीने लैगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला रात्रीच्या अंधारात बेशुद्ध अवस्थेत तळोजा भागात निर्जनस्थळी नेऊन सोडले.त्यानंतर तरुणी अचानक गायब झाल्याने तिचा शोध घेतला असता तरुणी तळोजा परिसरात आढळून आली.

Advertisement

पीडित तरुणीची अवस्था पाहून तरुणीने घडलेली आपबिती आईवडिलांना सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी खारघर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement