Take a fresh look at your lifestyle.

आंदोलनजीवी ठरवायचं झालं तर हा काटा भाजपकडेच वळतो, छगन भुजबळ यांचा हल्लाबोल

महाअपडेट टीम, 09 फेब्रुवारी 2021 :- आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो,” अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जनता दरबार उपक्रमाअंतर्गत प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

Advertisement

आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ या नव्या जमातीचा सध्या देशात उगम झाला आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

Advertisement

या प्रतिउत्तरात “आंदोलनजीवी अशा पद्धनतीने कोणाला हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे. त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो,” अशी खोचक टीका भुजबळ यांनी केली आहे .

Advertisement

“आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचं, कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली. सभागृहात त्यांनी आंदोलने केली,” असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

Advertisement

लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.

Advertisement
Advertisement