Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : सहा वर्षीय पोटच्या मुलाचा आईने हात-पाय बांधून झोपेतच गळा चिरला !

महाअपडेट टीम, 08 फेब्रुवारी 2021 :- एका महिलेने पोटच्या सहा वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना केरळच्या पलक्कड भागात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही एका मदरश्‍याची शिक्षिका आहे.या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisement

शहीदा सुलेमान (वय ३५) हिने स्वतः पोलिसांना फोन करून मुलाची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला अटक केली. तसेच मुलाचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तिने अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याची शक्‍यता आहे. आपला एक मुलगा परमेश्वराला समर्पित करण्यासाठी अशाप्रकारचं कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ वाजता तिने झोपेतच सर्वात लहान (आमिल) मुलाचे पाय बांधले. त्यानंतर बाथरूम मध्ये नेऊन त्याची गळा चिरून हत्या केली. महिलेचा पती सुलेमान हा दुसऱ्या खोलीत झोपल्याने त्याला कोणताही आवाज आला नाही.

Advertisement

महिला ही तीन महिन्यांची गरोदर आहे. तिला तीन मुले होती. तिचा पती सुलेमान हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. घटना घडली त्यावेळी तो आपल्या अन्य दोन मुलांसह वेगळ्या खोलीत झोपला होता. त्याला या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हतं. शहीदाने फोन करून माहिती दिल्यानंतर पोलीस घरी पोहोचले.दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement