Take a fresh look at your lifestyle.

गहुंजे स्टेडियमजवळ तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून, परिसरात खळबळ

महाअपडेट टीम, 08 फेब्रुवारी 2021:- पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गहुंजे स्टेडियमजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून या तरुणाचा घटनास्थळीच खून करण्यात आला की मृतदेह या ठिकाणी आणून टाकला, याचा तपास पोलीस करत आहे.

Advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मयत तरुणाच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच पिवळ्या रंगाचा शर्ट आहे. या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, गहुंजे स्टेडियमजवळ असलेल्या घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला आज पहाटेच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 आहे.

Advertisement

गहुंजे स्टेडियमजवळ असलेल्या घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला दर्शनासाठी तसंच व्यायाम करण्यासाठी पहाटेच्या वेळेस डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याच वाटेवर पहाटेच्या सुमारास त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांना दिसल्याने एकच  खळबळ उडाली होती.

Advertisement

 

Advertisement
Advertisement