Take a fresh look at your lifestyle.

बीसीसीआयने खेळाडूंना शेतकरी आंदोलनावर जबरदस्तीने ट्विट करायला लावणं बंद करावं !

महाअपडेट टीम : 04 फेब्रुवारी 2021:-  दोन महिन्यापासून आंदोलन चालू असताना शेतकयांच्या प्रश्नावर न बोलणारे क्रिकेटपटू रिहानाच्या ट्विटनंतर अचानक जागे होऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून मांडत आहे. या क्रिकेटपटुंनी लागोपाठ ट्विट केल्याने तसेच तसंच त्यांच्या ट्विटची भाषा, आशय आणि हॅशटॅग एकच असल्याने सोशल मीडियावर सध्या चर्चाही रंगली आहे.

Advertisement

या दरम्यान, काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआय क्रिकेटपटूंना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जबरदस्तीने ट्विट करायला लावत असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

दोन महिन्यापासून चाललेलं हे आंदोलन निर्णायक वळणावर आलेलं असताना बुधवारी परदेशी अभिनेत्रींनी शेतकऱ्यांची बाजू घेत मोदी सरकारवर टीका करणारे ट्विट केले.

Advertisement

यातच, भारताचा माजी महान भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. हे ट्विट चांगलेच व्हायरल होऊन सचिनला ट्रोलही करण्यात आलं होत. त्यानंतर आज भारताच्या विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग या क्रिकेटपटूंनीही यावर त्याच आशयाचं भाष्य करत ट्विट केले आहे.

Advertisement

हे सर्व बीसीसीआयने घडवून आणले आहे, असा आरोप आता कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. पण याबाबत बीसीसीआयने अजूनही कोणते भाष्य केलेले नाही. त्यामुळे बीसीसीआय यावर आता काय भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Advertisement
Advertisement