महाअपडेट टीम : 04 फेब्रुवारी 2021 :- शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंविरोधात कंगनाचा सध्या वाद सुरु असल्याने टि्वटरवरुन कंगना अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या शब्दांमध्ये टीका करत आहे. यामुळे अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. टि्वटरने अभिनेत्री कंगना रणौतचे दोन टि्वटस काढून टाकले आहेत. या प्रकारे ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला देण्यात आले आहे. त्यामुळे कंगनाचं अकाउंट पुन्हा बॅन होईल का ? याकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टि्वट केल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.रिहानासह क्रिकेटपटू रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे .
असं ट्विटरने म्हटलं आहे की, कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे आणि अशा पद्धतीचं ट्विट डिलेट केलं आहे.
मागील काही दिवसात गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबरच तिचा वाद चांगलाच गाजला होता, दिलजीतला तिने खलिस्तानी म्हटले. शेतकऱ्यांबद्दलही तिने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यामुळे अनेक युझर्सनी टि्वटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या टि्वटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली होती.