Take a fresh look at your lifestyle.

बजेटनंतर महागाईचा झटका, घरगुती सिलेंडर, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, सिलेंडर तब्बल २५ रुपयांनी महागला

महाअपडेट टीम : 04 फेब्रुवारी 2021:-  १ फेब्रुवारीला भारतीय अर्थव्यवस्थेचा बजेट सादर झाल्यानंतर तेल कंपन्यांनी आज सामान्य जनतेला एक मोठा झटका दिला आहे.  कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. त्याचबरोबर स्वयंपाक घरातील गॅसच्या देखील किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती वापरातील सिलेंडरच्या १४.२ किलोच्या सिलेंडमागे २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे.

Advertisement

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, १४.२ किलोचा सिलेंडर २५ रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी या सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली होती.

Advertisement

१९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कंपन्यांनी कपात केली आहे. मुंबईत या सिलेंडरच्या किंमत पाच रुपयांनी कपात होऊन तो १४८२.५० रुपयांचा झाला आहे.पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज याचे दर बदलत असतात.

Advertisement

त्यानुसार, आज डिझेलच्या किंमतीत ३५ ते ३७ पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलच्या किंमतीत ३५ ते ३४ पैशांनी वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.

Advertisement
Advertisement