Take a fresh look at your lifestyle.

मनसे संघटना आहे की पक्ष, ‘ही तर केवळ टाईमपास टोळी – आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली

महाअपडेट टीम : 04 फेब्रुवारी 2021:- ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही.  त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे” असे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेची खिल्ली उडवत प्रथमच एक जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. या विधानामुळे आदित्य ठाकरे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Advertisement

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून मनसेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद पुन्हा एकदा रंगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Advertisement

या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरकपातीबाबत जो सल्ला राज्य सरकारला दिला आहे, तोच सल्ला त्यांनी केंद्राला द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Advertisement

मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर मनसेचे नेते सध्या वारंवार हल्ले चढवत आहे. मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज देखील पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले होते. शिवसेना ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही फोटो असल्याचे दिसून आले होते.

Advertisement
Advertisement