Take a fresh look at your lifestyle.

छत्तीसगड हादरलं : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, वडिलांसह चार वर्षाच्या चिमुकलीचीही दगडाने ठेचून हत्या

महाअपडेट टीम : 04 फेब्रुवारी 2021:- छत्तीसगड :-  छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी अशी एक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेत नराधमांनी तिच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आले आहे. पोलिसांनी ही धक्कादायक बातमी बुधवारी दिली. त्यांनी म्हटले आहे की, आरोपींनी मुलीच्या वडिलांसह चार वर्षाच्या चिमुरडीचीही हत्या करण्यात आली आहे.

Advertisement

कोरबाचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांनी सांगितल्यानुसार, ही घटना 29 जानेवारी रोजी लेमरू पोलिसांतर्गत असलेल्या गढुपरोडा गावात घडली होती, परंतु मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. संतराम मझवार ( 45), अब्दुल जब्बार (29), अनिल कुमार सारथी (२०), परदेशी राम पनिका (35), आनंद राम पनिका (25) आणि उमाशंकर यादव (२१) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे कोरबा जिल्ह्यातील सतरेंगा गावचे रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Advertisement

समजलेली माहिती अशी की, मृतक हा बरपानी गावचा रहिवासी असून मुख्य आरोपी संतराम मझवार यांच्या शेतात गेल्या वर्षी जुलैपासून गुरे चारण्यासाठी जात होता. २९ जानेवारीला तो त्याची मुलगी आणि चार वर्षांच्या नातीला मोटारसायकलवरून आपल्या मूळ गावी जात असताना रस्त्यातच नशेच्या धुंदीत संतराम मझवार याने अन्य साथीदारांच्या मदतीने त्यांना मारहाण करत ढुपरोडा जवळ जंगलात नेलं. त्याठिकाणी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.

Advertisement

त्यानंतर त्या तिघांच्या डोकयात दगड घालून अत्यंत क्रूरतेने हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दिले. ढुपरोडा जवळ जंगलात नेले. त्या नराधमांवर पॉक्सो अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Advertisement
Advertisement