Advertisement

….शेवटी लेडी सब इन्स्पेक्टरने खांद्यावर वृद्ध व्यक्तीचा मृतदेह एक किलोमीटरपर्यंत पायी चालत आणला !

Advertisement

महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :- आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील एका महिला उपनिरीक्षकाने कर्तव्याचे एक अनोखे उदाहरण मांडले आहे. तिने आपल्या खांद्यावर 80 वर्षांच्या निराधार वृद्ध व्यक्तीचा मृतदेह एक किलोमीटरपर्यंत पायी चालत आणला. काजू उद्योगात प्रसिद्ध असलेल्या कासीबुग्गा-पलासा भागात ही घटना घडली. डीजीपी गौतम सावंग यांनी महिला एसआयच्या मानवतावादी मनोवृत्तीचे कौतुक केले आहे.

Advertisement

महिला उपनिरीक्षक कोट्टुरु सिरीशा यांनी सांगितले की, ‘आम्हाला एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाबद्दल माहिती मिळाली होती त्याचे वय जवळपास 80 वर्षांचे असेल. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार तो एक भिकारी होता. त्याचा मृतदेह अशा ठिकाणी होता की त्याठिकाणी शववाहिनी जाण्यासाठीही रस्ता नव्हता. आम्ही गावकर्यांना आवाहन केले पण कोणीही पुढे आले नाही.

Advertisement

विशाखापट्टणम येथील या महिला उपनिरीक्षकाने स्वतः फार्मसीचा अभ्यास केला आहे. त्यांना शरीरावर कोणतीही जखम दिसली नाही. त्यामुळे संशयिताची हत्या झाल्याचे कोणतेही कारण नव्हते. वृद्ध खूप कमकुवत दिसत होता आणि उपासमारीमुळे मृत्यू झाला असावा असे प्रथमदर्शी दिसत होते.

Advertisement

आव्हान करूनही त्याचा मृतदेह गावातील कोणीही व्यक्ती पुढे आला नाही, त्यामुळे महिला उपनिरीक्षक स्वत: पुढे येऊन त्यांनी एका मेकशिफ्ट स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह आपल्या खांद्यावर उचलला. या कामात त्यांनी एका ललिता ट्रस्टच्या सदस्याची मदत घेतली. पोलिसांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 25 मिनिटे लागली होती. हे पाहून काही ग्रामस्थही शेवटच्या क्षणी पुढे आले.

Advertisement

मी फक्त माझे कर्तव्य बजावले

Advertisement

महिला उपनिरीक्षक कोट्टुरु सिरीशा सिरीशाने सांगितले की, वडिलांचं स्वप्न होतं की मला पोलिसांच्या गणवेशात पाहावे. ‘लोकांची सेवा करण्यासाठी मी पोलिस दलात रुजू झालेआहे. माझ्याकडून जी काही सेवा होईल ती समाजाला देणे हे माझे ध्येय आहे. मृत व्यक्तीलाही सन्मान देण्याचा अधिकार आहे. म्हणून मी फक्त माझे कर्तव्य बजावले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

14 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

2 days ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

2 days ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago