Advertisement

भयंकर ! अल्पवयीन मुलीवर १७ जणांचा तब्बल ५ महिने बलात्कार

Advertisement

महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :-  कर्नाटकच्या चिकमकागुरू जिल्ह्यात एका 15 वर्षाच्या मुलीवर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Advertisement

या प्रकरणातील एक आरोपी म्हणून पोलिसांनी बलात्कार झालेल्या पीडितेच्या मावशीलाही अटक करण्यात आली आहे. पीडितेचे न्यूड फोटो, व्हिडीओ काढल्यानंतर तिला ब्लॅकमेलिंग केले गेलं आहे.

Advertisement

याप्रकरणी जिल्हाच्या बालकल्याण समितीच्या सभापतींनी  17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांच्या मुलीवर पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले.

Advertisement

पीडित तरुणीच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने ती तिच्या मावशीसोबत राहत होती. सध्या ती दगड फोडणाऱ्या कंपनीत काम करत होती. तिची ओळख गिरीश नावाच्या बस चालकासोबत झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला.

Advertisement

अभीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

याप्रकणी पोलिसांनी तिच्या मावशीलाही अटक केली आहे. आरोपींची ओळख पटली असून राजेश, अमित, संतोष, दीक्षित, अभी, गिरीश, विकास, मणिकांत, संपत, अश्वतगौडा, संतोष, निरंजन, नारायण गौडा, अभी गौडा, योगेश, तसेच याप्रकरणात मुलीची मावशी आणि दगड फोडणाऱ्या कंपनीच्या मालकाचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

6 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

1 day ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

1 day ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago