Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंना पुन्हा धक्का : राजेश कादमानंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :-  कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला २४ तासात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे.

Advertisement

काल १ फेब्रुवारी रोजी मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज डोंबिवलीत मनसेचे सलग दहा वर्ष नगरसेवक राहिलेला दुसरा मोठा चेहरा असलेले मंदार हळबे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

Advertisement

या पक्षांतराबाबत मनसेचे कल्याण डोंबिवलीतील एकमेव आमदार राजू पाटील हे राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर पोहचले आहेत.पक्षांतरानंतर मनसे नेत्यांमध्ये आणि कारकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे

Advertisement

मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सांगितले की, लहानपणापासून भाजपसाठी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रेरित झालो. देवेंद्र फडणवीस यांचे कामही प्रभावी आहे. राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपप्रवेश करत आहे.

Advertisement
Advertisement