Take a fresh look at your lifestyle.

CBSE Class 10, 12 Date Sheet 2021: शिक्षणमंत्र्यांनी CBSE बोर्डाचे 10 वी, 12 वी चे वेळापत्रक जाहीर केले, येथे पहा संपूर्ण टाईम टेबल

महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :-  सीबीएसई विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईच्या तारखेची घोषणा करताना शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रमुख सब्जेक्ट्सच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.

Advertisement

सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरु आहेत. हळूहळू कोरोनातून आपण मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत असल्याचं रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांना परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड एप्रिलममध्ये मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आलाय. त्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Advertisement

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले आहे की, “बोर्ड परीक्षा संपल्यानंतर आम्ही वेळेत मूल्यांकन करू आणि 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू.” म्हणजेच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करता येतील.

Advertisement

Advertisement

सीबीएसईचं वेळापत्रक कसं पाहाल?

Advertisement

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.
2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.
3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल.
4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

Advertisement
Advertisement