महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :- पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर राजकारण सुरू झाले आहे. फजिल्का येथील जलालाबाद येथे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दलातील कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली.
प्राप्त माहितीनुसार हिंसक चकमकीत शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या वाहनवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन जणांना गोळ्या लागल्या असल्याचे वृत्त (ANI) ने दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना त्यांना रोखले गेले तेव्हा ही ही हिंसक घटना घडली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या व दगडफेक केली.
या दरम्यान गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे. यापूर्वी फिरोजपूरमधील गुरशाहात दोन्ही पक्षांचे नेते आमने-सामने आले होते. सुखबीरच्या कारवर हल्ला करणाऱ्या जमावाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
या हल्ल्याबाबत जारी केलेल्या निवेदनात शिरोमणी अकाली दलाने म्हटले आहे की, “पोलिस समर्थित कॉंग्रेसच्या काही गुंडांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.