Take a fresh look at your lifestyle.

‘रामाच्या भारतात 93 आणि रावणाच्या लंकेत 51 रुपये कसे’ ? पेट्रोलच्या किंमतीवर स्वामींचा भाजपला घरचा आहेर

महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :-  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

Advertisement

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून वाढत्या इंधन दरावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अनोख्या शैलीमध्ये हे ट्वीट केले आहे. एक भावनिक मुद्दा पुढे करत त्यांनी आपल्याच सरकारला हा टोला लगावला आहे.

Advertisement

‘रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये 53 लिटर दर आणि रावनाच्या लंकेमध्ये पेट्रोलचे दर 51 रुपये लिटर आहे’ असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.

Advertisement

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच स्पष्ट बोलत असतात. यापूर्वीही डिसेंबरमध्येही स्वामींनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपला घेरले होते. त्यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली होती. यावेळी ते आपलेच सरकार आहे याचा विचार न करताच स्पष्ट मत व्यक्त करतात. यामुळे अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाला अडचणी येतात.

Advertisement
Advertisement