Take a fresh look at your lifestyle.

देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र आहे की नाही? असा प्रश्न मला पडला – छगन भुजबळ

महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :-  देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळी देशात महाराष्ट्र आहे की नाही? असा प्रश्न मला पडला, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत बोलताना, “करोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आले नाही”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

Advertisement

दरम्यान, देशात महाराष्ट्र आहे पण बजेटमध्ये दिसत नाही, नाशिक मेट्रोला जाहीर केलेल्या निधीचं स्वागत पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्राचा अर्थसंकल्प कुणासाठी आहे हे समजत नाही. भेदभाव करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी नवी योजना यामध्ये नाही. नोकरदारांना कोणताही दिलासा नाही, अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement