Take a fresh look at your lifestyle.

‘बजेट देशासाठी असावं, निवडणुकांसाठी नाही’ ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका

महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ते म्हणाले की,बजेट हे देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको, डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.तर विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

Advertisement

आता तुम्हाला भेटायला आलो म्हणून बोलायचं म्हणून काहीही बोलणार नाही. मी थोडा अवधी घेऊन बोलेल. पण जे काही ऐकायला आलंय त्यावरून बजेट देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको, अशी टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले की, ‘अर्थसंकल्पाची सर्व माहिती घेऊन त्याचा सारांश समजून घेऊन मी त्यावर भाष्य करेल ‘

Advertisement

डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी राजेश कदम, सागर जेधे, दीपक भोसले, अर्जुन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते

Advertisement
Advertisement