Take a fresh look at your lifestyle.

Budget 2021 : अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, LIC चे खासगीकरण होणार, आयडीबीआय बँकेसोबतच दोन सरकारी बँकांचेही…

महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :-    देशातील तब्बल 400 अब्ज डॉलर्सची सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) बद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. (LIC) च्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली आहे.

Advertisement

बाजारपेठेत IPO आणण्यासाठी केंद्र सरकारला LIC च्या प्रशासकीय नियमांत काही बदल करावे लागणार आहे. या नियमांत बदल केल्यानंतरच केंद्र सरकारला भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची हिस्सेदारी विकता येईल. त्यामुळे आता केंद्र सरकार यासाठी संसदेत सुधारणा विधेयक मांडणार
आहे.

Advertisement

याचबरोबर निर्मला सीतारमण यांनी आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा केली. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना सुरू केली आहे.

Advertisement

व्यवसाय करण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना करण्यात येईल. जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही. गुंतवणूकदारांसाठी एक नवीन तरतूद करण्यात आलीय. विमा क्षेत्रात एफडीआय 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2022 आर्थिक वर्षासाठी 20 हजार कोटी सरकारी बँकांना देण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement