Take a fresh look at your lifestyle.

Budget 2021 : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, कर रचनेतून मोठी सूट

महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना टॅक्स भरावा लागणार नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, कोरोना संकटाच्या काळात शेती, उद्योग, व्यापार अशा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण जग या महामारीच्या संकटातून जात आहे. अशा संकटाच्या काळात आपण सावरत आपल्या करदात्यांनाही सवलत द्यायला हवी, त्यानुसार 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता करातून सूट देण्यात आली आहे.

Advertisement

आता 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावा लागणार नाही. त्यांच्या बँक खात्यातूनच प्राप्तीकराची रक्कम घेतली जाणार आहे परंतु हा लाभ फक्त पेन्शनधारकांना मिळणार आहे.

Advertisement
Advertisement