Take a fresh look at your lifestyle.

Budget 2021: केंद्र सरकारचं बजेट म्हणजे, “खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा” !

महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :-  2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केला आहे. यावेळी हा अर्थसंकल्प वेगळा होता कारण कोरोना काळानंतर संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या घोषणाही केल्या.यात त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधीभार लावला आहे.

Advertisement

त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात असताना राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

Advertisement

पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे, अशी टीका राऊत यांनी केलीये. तसेच सामान्य माणसाला पोटाची आणि भुकेची भाषा कळते. तरुणांना रोजगाराची भाषा कळते. यांच्यासाठी अर्थसंकल्पात कुठलीही  तरतूद नाही. असा सवालही त्यांनी केला आहे.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पाचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून असताना बजेटमधून राज्याला काहीही मिळाले नाही , हा अर्थसंकल्प राज्याची निराशा करणारा आहे.

Advertisement

खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत.हे आकडे येत असतात परंतु ते कितीखरे हे 6 महिन्यांनी समजते. त्यामुळे केंद्राने आर्थिक थापा बंद करायला हव्यात!

Advertisement
Advertisement