Budget 2021 : कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी, कंपनीला वेळेवर पीएफ जमा करणं राहील बंधनकारक
महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :- आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वेतन कर्मचार्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. निवृत्तीवेतन ,ग्रॅच्युइटीमध्ये जर कर्मचार्यांचा पीएफ जमा करण्यास उशीर केला तर कंपनीला यासाठी पीएफ वजा करण्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कंपन्यांना वेळेवर कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा करणे बंधनकारक राहणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, काही कंपन्या पीएफ आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांसाठी कर्मचार्यांच्या पगारावर आर्थिक भार वाढवत आहे. त्यामुळे ते पीएफ ची रक्कम जमा करण्यास विलंब करतात. त्यामुळे कर्मचारी सुविधांचा लाभ घेण्यास मुकले जातात.
कर्मचार्यांना होणार्या अडचणींचा सामना वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी बोलून दाखवत होत्या. त्या म्हणाल्या की, कंपनीकडून पीएफची रक्कम भरण्यास उशीर झाल्यामुळे कर्मचारी व्याज आणि कमाई गमावत असतात. यामुळे कर्मचारी चिंताग्रस्त होतात.
अर्थसंकल्पात असे पहिल्यांदाच झाले आहे की, जेव्हा कामगार वर्गासाठी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर,गेल्या दशकात हे पहिलेच असे बजेट होते ज्यात थेट करात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली जाहीर करण्यात आली होती. यामध्ये अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. तर 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के तर 5 ते 7.5 लाख रुपयांवर 20 टक्के कर जाहीर करण्यात आला आहे.
75 वर्षांहून अधिक व्यक्तींना दिलासा
२०२२-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांना करविषयक मोठा दिलासा दिला आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना कोणताही आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, हा लाभ केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच मिळेल ज्यांना केवळ पेन्शन आणि व्याज उत्पन्नातून उत्पन्न मिळते.