Take a fresh look at your lifestyle.

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय – अजित पवार

महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :-  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Advertisement

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी आत्ताच्या अर्थसंकल्पात निराशाच पडली आहे. आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा या अर्थसंकल्पातही कायम आहे. महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव असं काहीही दिसत नाही.

Advertisement

देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जात आहे. परंतु हे आत्मनिर्भर नाही तर, देशाला बरबादीकडे नेणारं, अस्ताव्यस्त बजेट असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Advertisement

पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ आल्यामुळेच केंद्राने पश्चिम बंगालला 25 हजार कोटी जाहीर केले आहे. परंतु ते मिळतील याची खात्री नाही. असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

Advertisement
Advertisement