महाअपडेट टीम : 1 फेब्रुवारी 2021 :- केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाबाबत बोलताना, “करोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती.मात्र यावेळी विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका होत असताना यात बाबा रामदेव यांनीही उडी घेतली आहे.
विरोधकांवर टीका करताना स्वामी रामदेव म्हणाले की, अशा परिस्थितीत जर कोणी यापेक्षा चांगले बजेट दाखवले तर 2024 मध्ये मी त्याला जिंकून देण्यासाठी माझं सर्वस्व पणाला लावीन.
अर्थसंकल्पाबाबत रामदेव म्हणाले की, सरकार याबाबत अनेक धोरणे बनवत आहे परंतु लोकांनाही सहकार्य करावे लागेल. जर शेतकऱयांना आपले उत्पन्न वाढवायचे असेल तर दुग्ध उद्योग वाढवावे लागतील. अशा परिस्थितीत दुग्ध उद्योगासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, पर्यावरणाची गरज आहे, यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा सरकार पूर्णपणे पुरवित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने आपल्या घरात दोन ते चार गायी, म्हशी, शेळ्या पाळाव्यात. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीस लागून दुग्ध उद्योग वाढीस चालना मिळेल.
पुढे रामदेव बाबा म्हणाले की, आम्ही सुमारे दोन लाख कोटी खाद्यतेल हे परदेशातुन आयात करत आहे. जेव्हा आपल्या देशात ही निर्मिती सुरू होईल तेव्हा पुढील पाच वर्षांत कमीत कमी 12 ते 15 लाख करोड़ शेतकऱ्यांना मिळतील.
अशा परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबियांची निर्मिती भारतात व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहे. लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना सरकारबरोबर काम करावे लागेल.