महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :- शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक नेते परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. गेल्या महिनाभरातील ही तिसरी भेट आहे.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.
पालकमंत्री नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे भोसले अजित पवार यांच्या भेटीविषयी विचण्यात आल्यानं, त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार आहे.
तसेच शिवेंद्रराजे भोसलेच नाही तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेक नेत्यांची घरवापसी होणार असल्याचं दिसत आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच हा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 2020-21 चा अर्थसंकल्प दुपारी…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- जयपूर: पोलिसांच्या खाकीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी घटना घडली आहे.…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाला आपल्या भविष्याची…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- शतावरी एक औषधी वनस्पती आहे जी स्त्रियांमध्ये नैसर्गिक कामोत्तेजना…
महाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या हिंदू धर्मात अधिक लोकांना…