Take a fresh look at your lifestyle.

भाजपला दे धक्का ! शिवेंद्रराजेच नाही, तर अनेक आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार – नवाब मलिक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक नेते परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. गेल्या महिनाभरातील ही तिसरी भेट आहे.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.

Advertisement

पालकमंत्री नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे भोसले अजित पवार यांच्या भेटीविषयी विचण्यात आल्यानं, त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार आहे.

Advertisement

तसेच शिवेंद्रराजे भोसलेच नाही तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेक नेत्यांची घरवापसी होणार असल्याचं दिसत आहे.

Advertisement

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच हा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement