महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :- जवळ-जवळ एक वर्ष झालंय, कोविड-19 या साथीच्या आजाराची पहिली घटना भारतात घडली होती, कोरोना संक्रमणाची परिस्थिती तीव्र होऊन संपूर्ण जगच नष्ट होतंय का ? अशी भीती तज्ञांना वाटू लागली होती. आरोग्य साधन संपत्ती नसलेल्या देशात मोठ्या संख्येने लोक मृत होतील, अशी परिस्थिती उद्भवू लागली होती. परंतु भारताचं नेतृत्व अशा आपत्तीमध्ये नेहमी संधीच्या शोधात असतं.
सावधगिरीच्या उपायांसह या साथीच्या आजारासाठी आवश्यक अशी अनेक वैद्यकीय पावले उचलली गेली. लॉकडाउन झाले. संपूर्ण देश सहा महिने बंद झाला. यामुळे अर्थव्यवस्था आणि विकासावर विपरीत परिणाम स्पष्टपणे दिसून आला. जीडीपीत घट झाल्याने चतुर्थांश विकास दर कमी झाला.
आता वर्षभरातच हे चित्र बदलल्याचे पाहावयास मिळत आहे. आधीपासूनच भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूविरूद्ध मजबूत आहे. सर्वाधिक सर्वाधिक रिकवरी रेट आणि सर्वात कमी मृत्यु दर याची साक्ष देतो. संक्रमित देशांच्या तुलनेत भारत पूर्णपदावर येताना दिसत आहे.सर्वात आनंदाची बाब म्हणजे भारतात लसीकरणही सुरू झाले आहे. आपले अन्न – पाणी आणि निसर्गाच्या जीवनशैलीमुळे साथीच्या आजाराशी लढण्याचे रेकॉर्ड जगात सर्वोत्कृष्ट बनले आहे
आता भारतीय लस देखील जगातील सर्वात प्रभावी आणि किफायतशीर असल्याचे म्हटले जात आहे. भारतात लसीकरणानंतर फक्त 0.001 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली. मात्र मॉडर्ना आणि फायझरच्या लससाठी हा आकडा 0.6 टक्के आहे.
भारताकडे प्रभावी लस, जलद लसीकरण होत असल्याने भारत हे युद्ध जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. या बदलत्या चित्रातुन असे दिसून आले आहे की, कोविड-19 या साथीच्या आजारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई करून भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठू शकेल, या कोरोना काळात सर्वाधिक नुकसान हे उत्पादन व निर्यातीत प्रमुख भूमिका असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना झाला होता, सध्या हे उद्योगही भरभराटीस लागले आहेत.
जेव्हा पर्यटन, विमानसेवा आणि रियल एस्टेट यासारख्या सर्व क्षेत्रांचा खूप दिवसांपासून रखडलेला विकास पूर्णपदावर आल्यास उंचीवर जाण्यासाठी त्याला वेळ लागणार नाही.