महाअपडेट टीम 19 जानेवारी 2021 :- गुजरात राज्यातील सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना एका डंपरने चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना सुरतच्या स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुजरातच्या सुरतमधील किम रोडच्या फूटपाथवर काल रात्री (सोमवार) 18 जण झोपले होते. रात्री उशिरा ऊसाने भरलेला ट्रक अतिशय वेगाने आला. चालकाचं ट्रकवरील सुटलं आणि त्याने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं.
सविस्तर माहिती अशी की, सोमवारी गुजरातच्या सुरत येथील किम रोडच्या कडेला फूटपाथवर 22 मजूर झोपलेले होते. यावेळी रस्त्यावर एक डंपर आणि एक ट्रॅक्टर समोरासमोर आले असता. डंपर चालकाचा टाबा सुटला आणि डंपर फूटपाथवर चढल्याने येथे झोपलेल्या 22 मजुरांना या डंपरने चिरडले.
अपघातातील मृत्युमुखी पडलेले सर्व जण मजूर होते. हे मजूर राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.