Take a fresh look at your lifestyle.

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम – 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाली असून याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला ३ दिवस आधीच समजली होती. या चॅटमध्ये अर्णबने ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्याशी चर्चा केली की, “काहीतरी मोठे होणार आहे”.

Advertisement

जेव्हा पार्थ दासगुप्ताने अर्णबला “दाऊद” बद्दल काही आहे का, असे विचारले असता तेव्हा, “नाही सर, या वेळी पाकिस्तानवर हल्ला होणार. आणि हा हल्ला सामान्य हल्ल्यापेक्षा खूप मोठा असेल” अशी उत्तरे अर्णब देत होता, ‘हे चांगले तर चांगलेच होईल’ असे दासगुप्तांनी उत्तर दिले. ” नंतर अर्नब गोस्वामीने झालेल्या संभाषणात असेही म्हटले आहे की, सरकारलाही याबाबत पूर्ण खात्री आहे की, या निर्णयामुळे जनता खूप आनंदित होईल आणि त्याचा फायदा निवडणुकीत होईल,

Advertisement

अर्णब आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील हे व्हॉट्सअप चॅट्स 23 फेब्रुवारी 2019 रोजी झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

या व्हॉट्सअप चॅट्स नंतर अवघ्या तीनचं दिवसानंतर म्हणजेच 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी छावणीवर हल्ला केला होता.

Advertisement

यावरून हे सिद्ध होते की, अर्णब गोस्वामी याला भारतीय सैन्याच्या या गुप्त मिशनची माहिती ३ दिवस आधीच मिळाली होती.

Advertisement

प्रत्यक्षात, अर्नबला बालाकोट हवाई हल्ल्याची माहित झाल्यामुळे ते (राष्ट्रीय सुरक्षा घोटाळा) या प्रकारात मोडतात. हा हल्ला पूर्णपणे भारतीय लष्करचा टॉप सीक्रेट प्लॅन होता. या हल्ल्याबद्दल पंतप्रधानांसह काही सैन्य कर्मचारी आणि काही मंत्री यांनाचं फक्त याची माहिती होती. मग ही माहिती अर्णबला कुठून मिळाली मिळाली?

Advertisement

उत्तर स्पष्ट आहे की, सैन्यातून कुणीतरी ही माहिती पुरविली असावी. परंतु, याची शक्यता कमी आहे. ही माहिती केंद्र सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांकडून मिळाली असण्याची शक्यता आहे.

Advertisement

वास्तवात अर्णबला हे माहिती झाल तर त्यात काय बिघडलं, परंतु खरं तर अर्णबला या योजनेची माहिती असणं आणि या सीक्रेट प्लॅनची व्हॉट्सअप चॅट्सद्वारे चर्चा करणं, ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट 1923 च्या कायद्यानुसार हा देशद्रोहाचा गुन्हा मानला जातो.

Advertisement

आता तुम्हीच विचार करा की, हल्ला होण्याआधी अर्णबपर्यंत ही माहिती पोहोचणं हे राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे.

Advertisement
Advertisement