Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार रोखठोक! धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले….

महा अपडेट टीम 15 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने विरोधी पक्ष वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. या घडामोडींबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली. दरम्यान यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

Advertisement

या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता,  ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.

Advertisement

पोलीस विभाग हा हवी तशी चौकशी करत आहे, त्यामुळे आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारीही त्यात असावी. आणि या प्रकरणातील मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी”, अशी सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे.

Advertisement

राजीनाम्याचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. मात्र कालपासून तक्रार करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता समोर आली पाहिजे. अन्यथा कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement