Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानची पुन्हा नाचक्की :- मलेशियाने ‘या’ कारणानं पाकिस्तानचे विमान केलं जप्त, पाकिस्तानी प्रवाशांना अपमान करत विमानातून उतरवण्यात आलं !

महा अपडेट टीम 15 जानेवारी 2021 :-  पाकिस्तानला मित्र देश मलेशियाने जोरदार धक्का दिला आहे. मलेशियाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआईए) बोईंग 777 हे विमान जप्त केले आहे. पाकिस्तानने बोईंग-777 या विमानाचं भाडं चुकवलं नव्हतं. याप्रकरणी मलेशियाच्या स्थानिक कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.

Advertisement

ही घटना मलेशियातील क्वालालंपूर एअरपोर्टवर ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब अशी की , एअरपोर्टवर विमानात बसलेल्या प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा अपमान करत त्यांना विमानातून उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या इज्जतीचा फालुदा झाला आहे.

Advertisement

हे विमान पाकिस्तानने मलेशियाकडून भाडे तत्त्वार घेतले होते. विमानाचे भाडे थकवल्यामुळे मलेशियाने ही कारवाई केली आहे. तसेच विमानात बसलेल्या प्रवाशांना देखील उतरवण्यात आले.

Advertisement

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने(पीआईए) या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये पीआईए म्हणाले, मलेशियाच्या स्थानिक कोर्टाच्या आदेशावरून हे विमान ताब्यात घेण्यात आले असून ही एकतर्फी कारवाई आहे. पीआयई आणि अन्य पक्षकारांमध्ये यूके कोर्टात सुनावणी सुरू आहे.

Advertisement

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सकडे एकूण 12 बोइंग 777 विमाने आहे. पाकिस्तानच्या डेली टाईम्स या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार वेगवगळ्या कंपन्यांकडून ही विमाने ड्राय लीजवर घेण्यात येतात. मलेशियाने जप्त केलेले विमान हे देखील त्यापैकी एक आहे.

Advertisement
Advertisement