Take a fresh look at your lifestyle.

धनंजय मुंडे प्रकरण : ‘या’ तीन महिला नेता दिसल्यास सांगा, 500 रुपये रोख जिंका – तृप्ती देसाई

महाअपडेट 15 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणात माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते संतोष धुरी आणि यांनीही रेणू शर्माबाबत गौप्यस्फोट केल्याने नवा ट्विस्ट आला आहे.

Advertisement

आता या प्रकरणात आता भूमाता ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीमधल्या महिला नेत्यांना टार्गेट केले आहे.

Advertisement

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर हरवल्या आहेत, कृपया कुणाला दिसल्यास सांगावं. माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचं रोख बक्षीस, अशी उपरोधिक टीका तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Advertisement

जर ह्या तीन महिला नेता महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

Advertisement

हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. परंतु आता गायब झाल्यात कृपया त्यांनी येऊन रेणू शर्माला साथ द्यावी असही भूमाता ब्रिगेड संघटनेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement