Take a fresh look at your lifestyle.

…पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय !

महा अप डेट 15 जानेवारी 2021 :- एकीकडे राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप होत असताना, दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. या कारणांमुळे विरोधकांनी राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे.

Advertisement

त्याचबरोबर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

अजित पवार म्हणाले की, निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement
Advertisement