Take a fresh look at your lifestyle.

धनंजय मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट : …”तर माझाही धनंजय मुंडे झाला असता”, मनसे नेत्याचे रेणू शर्मावर गंभीर आरोप

महाअपडेट 14 जानेवारी 2021 :-  भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही रेणू शर्मा बद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे, तसेच आता मनसे नेते मनीष धुरी यानाही रेणू शर्माने फोन करुन, जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. कृष्णा हेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

Advertisement

बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करत पोलीस तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता मनसे नेते मनिष धुरीही तक्रार दाखल करणार आहे.

Advertisement

रेणू शर्माने नावाच्या महिलेने माझाही नंबर कुठूनतरी मिळवला होता, मला फोन करत माझ्याशी जवळीक साधण्याचा बराच वेळा प्रयत्न झाला,मी अधिक चौकशी केली तेव्हा मला समजल की रेणू शर्मा आणि तिची बहिण करुणा शर्माला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे.

Advertisement

म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मीही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. मी देखील या महिलेविरोधात तक्रार दाखल करणार आहे,’ अशी माहिती धुरी यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement