महाअपडेट टीम 13 जानेवारी 2021 :- तुर्कीमधील एका मुस्लिम धार्मिक गुरुला लैंगिक गुन्ह्याच्या आरोपात 1075 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अदनान ओक्तर असे या धार्मिक गुरुचे नाव असून तो मुस्लिम गुरु म्ह्नणून नावाजलेला होता. या प्रकरणी त्याला 2018 साली अटक करण्यात आली होती.
अदनानला इस्तांबुल कोर्टाने 10 वेगवेगळ्या गुन्ह्यांत शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 हून अधिक देशांमधील 45 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. अदनान ओक्तर हा तुर्कीतील नागरिकांना मुस्लीम धर्माच्या आधारावर शिकवण द्यायचा. एकेकाळी अदनानची जगातील ५० धर्म गुरूंमध्ये गणना केली जात होती. त्याने लिहिलेली सर्व धार्मिक पुस्तके ही बेस्ट सेलर ठरली आहेत.
तुर्कीमध्ये अदनानवर लैंगिक गुन्हा, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि राजकीय व सैनिकी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तब्बल 236 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यापैकी 78 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक बाब अशी अदनानला तुर्कीचे विद्यमान राष्ट्रपती रैय्यप एर्दोगान यांचे निकटवर्तीय मानले जायचे .तो एर्दोगानच्या पक्षाचे सदस्यही राहिला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुनावणीदरम्यान अदनान ओक्तर यांनी न्यायाधीशांनासमोर कबुल केले की, त्याला जवळपास 1000 गर्लफ्रेंड आहेत. सुनावणीदरम्यान एका महिलेने साक्ष देत सांगितले की, अदनानने तिच्यावर आणि तिच्या मैत्रिणींवर बर्याच वेळा लैंगिक अत्याचार केले.
अदनानच्या घरातून तब्बल 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या होत्या, महिलांवर जबरदस्तीने बलात्कार करून तो त्यांना गर्भनिरोधक गोळ्या खायला देत असत. 1990 साली अदनान ओक्तर हा पहिल्यांदा जगासमोर आला होता, त्यानंतर, त्याने धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनविण्याचा उद्योग सुरु केला . धर्माचा आधार घेऊन राजकारणही केले. अल्पावधीतच त्याने इतके पैसे कमावले होते की, तुर्कीमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तीमध्ये त्याची गणना केली जात होती.