Take a fresh look at your lifestyle.

वा रे पठ्ठ्या! या भारतीय फलंदाजाने खेचले 17 षटकार, 146 धावा करून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

महाअपडेट टीम 13 जानेवारी 2021 :- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी :  बुधवारी मेघालय आणि मिझोरम यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिष्ट याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 51 बॉलमध्ये त्याने तब्बल 146 धावा ठोकल्या आहेत.

Advertisement

त्याने धावांचा पाउस पाडत गगनचुंबी 17 षटकार आणि 6 चौकार ठोकत 146 धावा केल्या आहेत.  त्याने 102 रन्स फक्त षटकारांनी केले.  विकेटकीपर बॅट्समन असलेल्या पुनीतने क्रमांक चारवर येऊन 286.27 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

Advertisement

पुनीत बिष्ट हा टी -२० क्रिकेटमध्ये ४ थ्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेच्या दासुन शनाकाचा विक्रम मोडला आहे. शानाकाने 2016 मध्ये, सिंहली स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना गाना विरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 131 धावा केल्या होत्या त्याचबरोबर पंतने टी -20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 128 धावा केल्या आहेत.

Advertisement

पुनीत बिष्ट टी -20 मध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात 17 षटकार ठोकले होते. त्याचबरोबर पुनीत बिष्टने टी -20 क्रिकेटमध्येही भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदविला आहे. त्याने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला आहे. अय्यरने सन 2019 मध्ये सिक्किम विरूद्ध 145 धावा करत 15 षटकार ठोकले होते.

Advertisement

कोण आहे पुनीत बिष्ट?

Advertisement

पुनीत बिष्ट हा सध्या 34 वर्षांचा असून त्याचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता. पुनीत घरेलू क्रिकेटमध्ये खेळताना दिल्लीकडून विकेटकीपर फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. पुनीत 2012 या वर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनही खेळला आहे. 2018 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतकही झळकावलं होतं.

Advertisement
Advertisement