Take a fresh look at your lifestyle.

महिलांना निवडणूक लढवायची असलं तर, ‘पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं’!

महाअपडेट टीम 13 जानेवारी 2021 :- राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी हैदराबादमध्ये एक खळबळजनक विधान केले आहे. ‘ महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे, तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं जातं, तसेच त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement

त्या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारतातील राजकीय पक्षांवर टीका केली आहे.

Advertisement

ते म्हणाले की, कोणाताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो, तसेच महिलांबद्दल खूप प्रश्न उपस्थित करत त्याना डावलल जातं. याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्याचे राजकीय पक्ष हे ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना पक्षाकडून तिकीट दिले जाते.

Advertisement

यावेळी त्या म्हणाल्या की, सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला आहेत परंतु ही संख्या अतिशय कमी असल्याचे म्हणत ही बाब चिंता वाढवणारी आहे. . यामुळे महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement